दुसरबीड (हॅलो बुलडाणा) येथील गट क्रमांक 601 मधील सागवान, चंदन आणि आड जात झाडे पुष्पाने तोडले.या वृक्षतोड प्रकरणी वन विभागाच्या पथकाने 4 डिसेंबर रोजी मोका पाहणी करून पंचनामा केला. परंतु ‘पुष्पा’ मोकाट असून वन विभागाने त्यांच्यापुढे नांगी टाकल्याचे दिसते.
दुसरबीड येथील गट क्रमांक 601 मधील 400 ते 500 सागवानाची अवैध कटई तसेच गट नंबर 678 मधील 100 च्या जवळपास सागवानाची झाडे अवैध उत्खनन करून मुरमा खाली दाबल्या प्रकरणी ॲड चैतन्य देशमुख आणि गणी शेख यांनी तक्रार केली होती. गट नंबर 601 चे मालक शेख सत्तार शेख लतीफ याने जमीन वाहिती करण्याच्या नावाखाली सदर गटांमध्ये अवैध उत्खनन करून गटात असलेल्या सागवान,चंदन आणि आडजात झाडाची अवैध कत्तल करून परस्पर विल्हेवाट लावली. दरम्यान सपाटीकरण करताना गट नंबर 678 मधील 100 च्या जवळपास सागवानांची जिवंत झाडे मुरमाखाली दाबल्याचा आरोप तक्रारकर्ते देशमुख यांनी केला आहे.
याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने मेहकर वन विभागाचे अधिकारी आणि त्यांची टीम ने मोका पाहणी केली.दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्याने उलट तक्रारकर्ते यांनाच उलट सुलट प्रश्न करून आरोपी आणि वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वन विभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे सदर चौकशी पारदर्शकपणे होईल की नाही यावर उपस्थितांनी शंका व्यक्त केली.
तसेच या प्रकरणाची याचिका दाखल करण्यात यावी अशी मागणी उपस्थित लोकांमधून करण्यात आली
दरम्यान लवकरच चौकशी अहवाल सादर करण्यात येईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले.दरम्यान आज दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी वनरक्षक धारे यांनी प्रत्यक्ष मोक्कास्थळी येऊन पंचनामा केला आणि पंचनाम्यावर पंच लोकांच्या सह्या घेतल्या परंतु पंच लोकांचं म्हणणे ऐकून घेतले नाही.
यावेळी पंच लोकांचे म्हणणे होते की आज रोजी सदर गटांमध्ये जमीन सपाट झालेली दिसते परंतु जमीन सपाट करण्या अगोदर या गटामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवान ची झाडे होती याचाही उल्लेख आपण पंचनामात करावा परंतु वनरक्षक घारे यांनी सांगितले की यानंतर तुमचे वेगळे बयान होतील त्यावेळी तुम्ही ते सांगा असे म्हणून वनरक्षक यांनी त्यांच्या सोयीने पंचनामा करून निघून गेले.