मेहकर (हॅलो बुलडाणा) आधी बिबट्या दिसून आला होता. त्यामुळे शेतकरी धास्तावले होते. दरम्यान शहानिशा न करता अज्ञाताने महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचा भीषण व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याने
डोणगाव -घाटबोरी वनक्षेत्रात येणाऱ्या अंजनी बु,हिवरा साबळे, अंधरुड या शेत शिवारात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.परंतु हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा वनअधिकारी यांनी केला असून, कोणीही अफवा पसरवू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.
मेहकर तालुक्यातील
डोणगाव-घाटबोरी वनपारिक्षेत्रात येणाऱ्या अंजनी बु,हिवरा साबळे, अंधरुड या शेत शिवारात बिबट्या असल्याचे दिसून आले होते.ज्याने शेतकरी आधीच धस्तावलेले होते तर दुसरीकडे कोणतीही शहाणीशा न करता नागापूर येथील महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.याप्रकरणी गंभीर दखल घेऊन वन विभागाने नागापूर गाठून शहाणीशा करत तो व्हायरल व्हिडिओ खोटा असल्या बाबत दावा करीत अफवेवर विश्वास ठेऊ नका असा संदेश दिला आहे.
यापरिसरात बिबट्या असल्याची बोंब उठली असता 29 नव्हेंबर रोजी अंजनी बु शेत शिवारत पुंड यांचा शेतात रोहिच्या पिल्लाची बिबट्याने शिकार केली होती.या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली.या घटने दरम्यान मात्र त्या बिबट्याच्या पाऊल खुणा मिळून आल्या नाहीत.अश्यातच दुसरीकडे 2 डिसेंबर रोजी पुन्हा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये डोणगाव जवळील नागापूर येथे बिबट्याने एका महिलेवार हल्ला केला करून महिला गंभीर जखमी झाल्याचे प्रदर्शित करण्यात आले. या व्हिडिओने प्रचंड दहशत पसरत आहे.परंतु वन परिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांनी नागापूर गाठत गावात अशी कोणती घटना घडली काय? याची माहिती घेतली तेव्हा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील यांच्याशी चर्चा करून नागापूर येथील विचारपूस केली असता,महिलेवर हल्ला झाला नसल्याची माहिती पुढे आली. दरम्यान सदर व्हिडिओ खोटा असल्याचा दावा वनअधिकारी यांनी केला असून, कोणीही अफवा पसरवू नये,बिबट्या दिसल्यास वन विभागाला कळवा,असे आवाहन वनविभाग व पोलिसांनी केले आहे.