बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सद्भावना सेवा समितीच्या वतीने दि. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ दरम्यान श्री खाटुशामजी रेल्वे यात्रा व श्रीमद्भागवत कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे प्रवक्ते चित्रकूट येथील बालसंत श्री दीपशरणजी महाराज असणार आहेत. शहरातील शाम भक्तांच्या आग्रहास्तव ही ७ दिवसीय यात्रा ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर आयोजित करण्यात आली असून मर्यादित जागा असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्या भाविकांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक भाईजी यांनी दिली.
या भागवत कथेचे मुख्य यजमान सौ. सरला सुरेशचंद्र गट्टाणी असून कथेदरम्यान भागवत महात्म्य, राजा परीक्षित-शुकदेव कथा, शिव विवाह, ध्रुव चरित्र, राम जन्म, कृष्ण जन्म, रुख्मिणी स्वयंवर, गोवर्धन पूजा व सुदामा चरित्र असे विविध धार्मिक प्रसंग साजरे होणार आहेत.
यात्रेचा प्रारंभ ३० ऑगस्ट रोजी दुपारी ११.३० वाजता मलकापूर स्टेशनवरून होणार आहे. भाविकांसाठी चहा, नाश्ता, दोन वेळचे भोजन व निवास व्यवस्था समितीतर्फे करण्यात येणार आहे. खाटुशामजी, शामकुंड, जीनमाता मंदिर, सालासर बालाजी, पुष्कर, जयपूर आदी पवित्र स्थळांचे दर्शन घडवले जाणार आहे. भाविकांनी त्वरित नोंदणी करून या आध्यात्मिक यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाईजींनी केले.











Total Users : 3369779