देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) सिंनगाव जहांगीर ते गारगुंडी रोडवरील पॉवर हाऊस च्या समोर पुलाजवळ ट्रॅक्टर व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे की,मृतक राजु अनील पवार , वय 14 वर्ष रा मेहुणा राजा हा हीरो कंपणीची स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची विना नंबरच्या मोटरसायकने सिंनगाव जहाँगीर येथुन त्याचे घरी मेव्हाणाराजा येथे जात असतांना ट्रॅक्टर क्रं एमएच -30 जे-
9386 महींद्रा कपंणीची लाल रंगाचे चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन मृतकचे मोटरसायकला धडक मारुन त्याला गंभीर जख्मी केले , अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय गुट्टे हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले , जखमीची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले,
श्याम राम शिराळे रा मेहुणा राजा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालक विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.