देऊळगांव राजा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते व तालुका आरोग्य अधिकारी डॉ आकांक्षा गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लेप्रोस्कोपीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात 29 महिलांनी या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेतला.
अत्यंत कमी त्रास, कमी रक्तस्त्राव आणि एकच दिवस भरती राहण्याची आवश्यकता असल्याने अंढेरा परिसरातून लॅप्रोस्कोपी द्वारे शस्त्रक्रिया करण्याचा कौल वाढताना दिसत आहे. त्यामुळेच या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेराचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवानंद शिंगाडे यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.