बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रचंड भ्रष्टाचाराने गाजलं असून आताही बेकायदा गोरगरीब रुग्णांच्या आहारात भ्रष्टाचार करण्यात येत असल्याची ओरड आहे. येथे नियमानुसार आहार नाही!
मिळणारे जेवणसुद्धा गोरगरीब रुग्णांना उत्कृष्टरित्या मिळत नाही!
पोळ्या कच्च्या तर भाजीला चवच नसते ! रात्री जेवण नियमानुसार मिळत नाही तर सकाळी नाश्ता देखील योग्य मिळत नसल्याचा शेराच काही संतप्त रुग्णांनी मारला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष वेधने गरजेचे आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह नेहमीप्रमाणे पाळण्यात आला. त्यानंतर याच रुग्णालयात जेवणाचे वाभाडे काढले जात आहे.कंत्राटदार मनमानी कारभार करत असून जिल्हा शल्य चिकित्सक यांचे याकडे दुर्लक्ष आहे की,आर्थिक देवाणघेवाण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात
रुग्ण व त्यांचे नातेवाईक मिळेल ते खाऊन दिवस काढू लागलेत. जिल्हा रुग्णालयातील स्वयंपाकगृहामध्ये अन्नाची चव संबंधित अधिकाऱ्यांनी चाखावी..म्हणजे त्यांना स्वयंपाकाची चव कळेल! परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. जेवणाचा दर्जा घसरण्यास रुग्णालयामधील स्वयंपाकगृहातील यंत्रणाच जबाबदार नाही तर त्यास अन्य बाबीसुद्धा कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या जेवनाचा नाश्ता व रात्रीचे जेवण नियमानुसार का देण्यात येत नाही ? याची चौकशी होण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.शिवाय जेवणाचा दर्जा व नियमित तपासणी होणे गरजेचे असल्याची ही मागणी करण्यात आली आहे.
क्रमशः














