बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मेहकरात राजकीय कारणावरून मोठा राडा झाला आहे.पण याचे कारण पोलीस देखील सांगू शकले नाही. जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद होऊन माळीपेठ भागासह इतर काही भागांमध्ये वाहने पेटवून देण्यात आली. मारहाणीच्या घटनाही घड ल्यात. शिवाय दोन्ही गटाकडून दगडफेक ही करण्यात आली. दरम्यान 23 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केल्याची माहिती आहे.मेहकर कडकडीत बंद असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघातील निवडणुक या दंगल सुदृश्य परिस्थितीला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान दोन गट एकमेकांसमोर आमने-सामने ठाकले असून, मारहाणीच्या घटना घडल्या आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे.दोन्ही गटाकडून दगडफेक ही करण्यात आली.त्यामुळे अनेक जण जखमी झाले तर 23 जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून बाजारपेठ बंद आहे. दरम्यान नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.