spot_img
spot_img

EXCLUSIVE दादांचा ‘वादा’ खरा ठरणार का? काझींना MLCची संधी मिळणार? सुनेत्राताईंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील (MLC) एका जागेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानपरिषदेची मुदत संपत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये जिल्ह्याला संधी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या नावाची आघाडीवर चर्चा असून पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी पुढे रेटली आहे. आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काझींना संधी द्यायलाच हवी असा ठाम सूर लावला.

या मागणीला अधिक धार देण्यासाठी पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे, विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ‘दादांनी दिलेला शब्द’ आणि ‘सुनेत्राताईंचा निर्णय’ याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

काझी यांचा राजकीय प्रवासही तितकाच प्रभावी मानला जातो. सलग सहा पंचवार्षिक पालिका सदस्य, दहा वर्षे उपनगराध्यक्ष आणि दीर्घकाळ जिल्हा नेतृत्वाचा अनुभव यामुळे त्यांचे नाव मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा ऐतिहासिक आणि राजकीय वारसा देखील या चर्चेला अधिक वजन देतो.

दरम्यान, पक्षात ही जागा विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी निर्णायक ठरू शकते, असा मतप्रवाह आहे. मात्र अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!