बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सलग तीनदा आमदार राहिलेले शिवसेना शिंदे गटाचे डॉ. संजय रायमूलकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिद्धार्थ खरात यांनी धूळ चारली आहे.यंदा डॉ संजय रायमुलकर विजयाचा चौकार मारण्याचे मनस्थितीत होते परंतु स्वेच्छा निवृत्ती घेऊन शिवसेना उबाठा गटा कडून सिद्धार्थ खरात यांनी नवखे असताना देखील
डॉ. संजय रायमूलकर यांचा दणदणीत पराभव करून विजयाचा फेटा बांधला आहे.तीन टर्म आमदार राहिलेले संजय रायमुलकर यांनी लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघात सत्ता असून देखील विकास कामे केल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.परंतु रायमुलकर यांना अति आत्मविश्वास नडला.शिवाय आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांचा हा मतदारसंघ गड समजला जातो.परंतु त्यांनाही लोकसभेत येथून पाहिजे तेवढी लीड मिळाली नाही.दरम्यान विकास कामे करणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न रेटणारे सिद्धार्थ खरात यांना आशिष राहटे,सिंदखेडराजाचे दिलीपराव वाघ, किशोर गारोळे यांनी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.हेच किंगमेकर ठरले आहेत! प्रचारादरम्यान
‘हॅलो बुलडाणा’ ने लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचवले सिद्धार्थ खरात यांचा अखेर विजय झाला असून महाविकस आघाडीची जिल्ह्यातून आलेली ही एकमेव जागा आहे.