spot_img
spot_img

💥बिग न्यूज! मशालीचा लखलखाट होणार?की धनुष्यबाण नेम साधणार?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सात विधानसभा मतदारसंघात 62.84 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली.परंतु एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार त्यांचा एक्झिट पोल म्हणतोय की मतदारांचा जयश्रीताई शेळके यांच्या बाजूने कौल दिसून येत आहे.आमदार संजय गायकवाड यांनी कोट्यावधींची कामे करूनही त्यांचे आक्रमक विधानं आणि जयश्रीताई यांची शांततापूर्वक सामाजिक कामे आणि सुस्वभाव यामुळे जयश्रीताई या विधानसभा निवडणुकीत पुढे दिसून येत आहे.शिवाय बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतदान टक्केवारी कमी झाल्याने आमदार गायकवाड यांची सीट धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.परंतु 23 तारखेला ईव्हीएम माता कोणाला प्रसन्न होते हे दिसून येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!