लोणार (हॅलो बुलडाणा) विधानसभा निवडणूक असल्याने सगळे विकास निधी मिळून करणारे अजगर सुस्त नव्हे तर फुत्कार सोडत आहेत.परंतु पिंपळनेर येथे खराखुरा अजगर निघाल्याने अनेकांची बोबडी वळली. लोणार जवळच पिंपळनेर येथील शेतकरी सचिन सानप यांच्या शेताच्या गोठ्याजवळ सायंकाळी ८:०० च्या सुमारास भला मोठा अजगर दिसला. त्यांनी ‘मी लोणारकर’ टीम चे सर्पमित्र सचिन कापुरे, याना याची माहिती दिली तत्काळ त्त्यानी निसर्ग मल्टिपर्पज फाउंडेशन चे सर्पमित्र ज्यांना सापांचा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे विनय कुलकर्णी व सर्पमित्र कमलेश आगरकर यांच्या मदतीने अजगर या मोठ्या सापाला रेस्क्यू केलं. दुर्मिळ असलेल्या या अजगराला इंडियन रॉक पायथॉन म्हणून ओळखलं जातं.
या सापाची लांबी ७ फूट व वजन १०.२५ किलो आहे या अजगराला रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात वनविभागला कळवून सोडण्यात आले या वेळी सर्पमित्र बंटी नरवाडे, कमलेश आगरकर , सचिन कापुरे, उमेश चिपडे, विलास जाधव, विशाल वर्मा, विलास खरात, ऋतिक सुसर, चंदू अंभोरे व इतर सर्पमित्र तसेच वैन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.