बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एम एच 30 -46 84 क्रमांकाचा ट्रक 7 नोव्हेंबरच्या दुपारी बाळापूरच्या विजयलक्ष्मी पेट्रोल पंपावर उभा होता.परंतु अज्ञात चोरट्याने हा ट्रक चोरून नेला.दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासावरून खामगाव ते मुक्ताईनगर हायवे मार्गावरील घोडसगाव शिवारात हा ट्रक जप्त करून आरोपीला गजाआड केले आहे. प्रीतम अजबराव वानखडे वय 33 रा.सिद्धार्थ नगर चिखली ह.मू.यशोधरा नगर खामगाव असे चोरट्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी अब्दुल एजाज अब्दुल समद रा. बाळापुर जि.अकोला यांनी टाटा कंपनीचा दहा टायरी ट्रक बाळापूर येथील विजय लक्ष्मी पेट्रोल पंपावर 7 नोव्हेंबर रोजी उभा करून ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.10 नोव्हेंबर रोजी ते परतले असता सदर ठिकाणी ट्रक आढळून आला नाही.त्यामुळे त्यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व खामगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार व इतर टीमने अखेर हा गुन्हा उघडकीस आणला आहे. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी मुक्ताईनगर हायवे मार्गावरील घोडसगाव शिवारातून 5,50,000 रुपये किमतीचा ट्रक जप्त करून चोरट्याला जेरबंद केले आहे.