बीबी (हॅलो बुलढाणा/भागवत आटोळे ) समृद्धी महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना 11 नोव्हेंबर च्या रात्री घडली.
समृद्धी महामार्गावर काल रात्री 8.30 च्या सुमारास नागपुरकडुन मुंबई कडे जाणारा ट्रक क्र.RJ.14.GN.1595 हा मांडवा जवळील चॅनल क्र.310 वर पंचर झाला होता. उभ्या ट्रकच्या चाकाचे पंचर काढत असतांना मागून येणाऱ्या MH.06.AW.1789 क्रमांकाच्या कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात कार मधील एक जण जागीच ठार झाला आहे.सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त होताच ठाणेदार संदीप पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.