मेहकर (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या प्रचारासाठी जानेफळ येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व खासदार मुकुल वासनिक यांची जाहीर सभा होणार आहे. उद्या, दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता होणाऱ्या या सभेत खासदार वासनिक यांची तोफ धडाडणार असून, यामधून सिद्धार्थ खरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
काँग्रेसचे मेहकर तालुका अध्यक्ष देवानंद पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांनी व मतदारांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव यांनी देखील या सभेला मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
या सभेला महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी या सभेला विशेष महत्त्व देण्यात आले असून, यामुळे जानेफळ येथे या सभेचे आकर्षण व जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे.














