spot_img
spot_img

पत्रकार भवनात दिमाखदार ध्वजारोहण; महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथे १ मे रोजी सकाळी ७:४५ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नितीन शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली होती. ध्वजारोहणानंतर नितीन शिरसाट यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल आणि राष्ट्रीय एकात्मतेतील राज्याची भूमिका अधोरेखित केली. महाराष्ट्र राज्य हे राष्ट्रीय एकात्मतेचे दिशादर्शक असून विविधतेतून एकतेचा संदेश देणारे आहे, असे ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांनी एकोप्याने कार्य करत राज्याच्या विकासात योगदान द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी पत्रकारांना उद्देशून मार्गदर्शन केले. पत्रकारांनी आपल्या लेखणीद्वारे महाराष्ट्र धर्म जपावा आणि समाजातील सकारात्मक बदलासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. समाजप्रबोधनात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला पत्रकार राजेश डिडोळकर, चंद्रकांत बर्दे, राजेंद्र काळे, रविकिरण टाकळकर, जितेंद्र कायस्थ, प्रेमकुमार राठोड, कासिम शेख, दीपक मोरे, डॉ. भागवत वसे, अभिषेक वरपे, अजय राजगुरे, विलास सोनूने, अजय काकडे, आकाश भालेराव, आकाश गायकवाड, मृणाल सावळे, सुनीता सावळे, वैशाली राजपूत यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण राष्ट्रभक्तीने भारलेले होते. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित करत पत्रकारांनी समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!