मेहकर (हॅलो बुलढाणा) विक्रमी मतांनी पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदे गटाचे प्रस्थापित आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात प्रचार दौरा सुरू करून मतांचा जोगवा मागण्यासाठी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.परंतु उबाठा गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे आश्वासक चेहरा असल्याने आणि त्यांनी रखडलेल्या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे अभिवचन दिल्याने ते प्रबळ उमेदवार समजले जात आहेत. दरम्यान त्यांनी विकासाचा अनुशेष मीच भरून काढणार असल्याचे सांगत मशाल पेटवली आहे.
शेतकरी,बेरोजगर,लोणार पर्यटन विकास असे अनेक मुद्दे त्यांनी हाताशी धरून मतदारांना अभिवचन दिले आहे.ते म्हणाले की,लोणार हे जागतिक पर्यटन स्थळ आहे.येथे पाहिजे तसा विकास झालेला नाही.जे आधी सत्तेवर आहेत त्यांनी सर्वांगीण विकास करायला हवा होता.आता ते विकास कामाच्या मुद्द्यावर मतांचा जोगवा मागत आहेत.परंतु मतदार दूध खूळे नाहीत.त्यांना विकास काय असतो ते समजते.उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘गद्दारी विरुद्ध खुद्दारी ‘ याविरुद्ध लढत आहेत.कोण गद्दार आहेत आणि कोण खुद्दार आहेत हे सर्वांना कळतंय.त्यामुळे विकासाच्या कितीही बोंबा मारल्या तरी,जनता मलाच मतरूपी आशीर्वाद देऊन,जिंकविणार असा विश्वास खरात यांनी व्यक्त केला आहे.तर डॉ.संजय रायमुलकर म्हणाले की,
मेहकर- लोणार मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयांचा निधी
मंजूर करून आणला. यातील बहुतांश कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसून आम्हीच जिंकून येणार आहोत.














