मेहकर (हॅलो बुलडाणा) वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या अधिकृत उम्मेदवार डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचा विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गावभेटीचा प्रचार दौरा जोरात सुरु आहे. दिनांक 5 नोव्हेंबरलाच प्रचाराचे नारळ फुटून गावभेटीचा आणि जनसंवाद दौरा तेजीत सुरु झाला आहे. उच्च शिक्षित उम्मेदवार आणि विकासाचं विशिष्ट व्हिजन असल्यामुळे डॉक्टर ऋतुजा ऋशांक चव्हाण यांना समाजाच्या विविध स्तरावरून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक पसंती मिळत आहे. जनसामान्य जनता आपल्या हक्काचा उम्मेदवार म्हणून डॉक्टर ऋशांक चव्हाण यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेचा मुद्दा असो किंवा गाव, शहरातील आर्थिक विषमतेची दरी असो या प्रत्येक मुद्यावर त्यांनी आधीच प्रकाश टाकला आहे.
दिनांक 7नोव्हेंबरला त्यांनी सुलतानपूर, बोरखेडी, वेणी, गुंधा, हिरडव,वढव, आरडव, दाभा, पहूर या गावाला भेट दिली असता गावगाड्यातील जनतेंनी त्यांना मोठ्या मजबुतीने साथ देण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक गावातून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ही परंपरागत पक्षांची नक्कीच डोके दुखावणारी गोष्ट आहे. डॉक्टर ऋतुजा ऋशांक चव्हाण यांचा एकंदरीत ताफा पाहता या निवडणुकीत प्रत्येकासमोर त्यांच कडवं आव्हान उभं असेल.