बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काका पुतणी विरुद्ध रणसंग्रामरंगात आला असून,यंदाची निवडणूक गायत्री शिंगणे जिंकणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त होत आहे.
राजमाता जिजाऊसाहेब चरणी नतमस्तक होऊन अपक्ष उमेदवार गायत्री शिंगणे यांच्या प्रचाराच्या झंजावाताला सुरुवात झाली आहे.पहिल्याच दिवशी सिंदखेड राजात काका विरुद्ध पुतणीचा संघर्ष दिसून येत आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी सिंदखेड राजा मतदारसंघाकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे, या मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे विरुद्ध त्यांची पुतणी गायत्री शिंगणे असा काका पुतणीचा संघर्ष पाहायला मिळतोय, अपक्ष उमेदवार गायत्री शिंगणे यांनी आज राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद असल्याने गायत्री शिंगणे यांचा विजय निश्चित असल्याचे समजले जात आहे.