spot_img
spot_img

💥ब्रेकींग! खामखेड रेल्वे परिसरात आढळला अनोळखी मृतदेह!

मलकापूर (हॅलो बुलडाणा /रविंद्र गव्हाळे) तालुक्यातील खामखेड परिसरातील रेल्वे रुळावर रविवारी रात्री अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान लोको पायलट चालकांनी खामखेडचे उपस्टेशन अधीक्षक दुष्यंत मधुकर पिटुरकर यांना याबाबत माहिती दिली.

मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, ट्रॅकमन समाधान भगवान पंडित यांनी ही नोंद केली आहे. मृत व्यक्तीची उंची साधारण ५ फूट असून त्याची शरीरयष्टी सडपातळ, रंग काळसर, दाढी वाढलेली व डोक्याचे केस लांब असल्याचे सांगण्यात आले आहे. मृताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा फाटलेला शर्ट व निळसर रंगाची फाटकी अंडरविअर होती.

संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना नागरिकांनी मलकापूर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!