चिखली (हॅलो बुलडाणा) सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज बलिप्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर चिखली येथील खंडाळा रोड वरील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. याशिवाय आजपासून धाड, रायपूर, अमडापूर व उदयनगर अशा अन्य चार सर्कलमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महायुतीमध्ये असलेल्या सर्व घटक पक्षांची एकजूट प्रकर्षाने दिसून आली.
चिखली येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जेष्ठ नेते एड. मंगेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे यांनी या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, प्रकाश महाराज जवंजाळ, सुनील वायाळ, डॉ. प्रतापसिंह राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख गजानन मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई म्हस्के, प्रचार कार्यालयाचे प्रमुख प्रेमराज भाला, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, कृष्णकुमार सपकाळ, सुरेंद्र पांडे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष सुदर्शन खरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.