बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाविकास आघाडीचे चिखली मतदार संघातील अधिकृत उमेदवार व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या जामठी येथील प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळतोय ! शिवाय बोंद्रे यांना ‘हा आपल्या कामाचा माणूस आहे’ अशा शब्दात ग्रामस्थांची शाब्बासकी देखील मिळत आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने वज्रमूठ आवळली आहे. राहुल बोंद्रे यांनी जोरदार प्रचाराला प्रारंभ केला असून आज मतदारसंघातील जमठी येथील प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद दिसून आला.मतदारसंघातील गाव भेट दौऱ्या निमित्त राहुल बोंद्रे यांनी जीवाभावाच्या माणसांसोबत संवाद साधून लोकांचे आशीर्वाद घेतले.लोकाभिमुख विकासासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन एकजुटीने काम करणे व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा त्यांना विश्वास दिला.आपुलकीने केलेले स्वागत आणि ‘हा आपल्या कामाचा माणूस आहे’ अशा शब्दात दिलेली शाबासकी मला बळ देणारी असल्याचे राहुल बोंद्रे यांनी यावेळी सांगितले.