spot_img
spot_img

💥ब्रेकिंग ! ऐन दिवाळीत शेतमजुरावर काळाचा घाला ! ट्रक ट्रॅक्टरच्या अपघातात दोन महिला ठार ! गावकऱ्यांनी केला रस्ता रोको ! -10 जण जखमी; 3 गंभीर !

मलकापूर (हॅलो बुलढाणा/रविंद्र गव्हाळे) दिवाळीच्या तोंडावर धनत्रयोदशीच्या दिवशी ट्रक ट्रॅक्टरच्या अपघातात दोन महिला ठार तर दहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नॅशनल क्रमांक सहावर वडी फाट्या जवळ ट्रक व ट्रॅक्टरचा अपघात 2 महिला जागीच ठार तर 10 जण किरकोळ जखमी तसेच 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान संतप्त नागरिकांनी तीन तासापासून ट्रॅफिक जॅम केलीअसून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनेची माहिती मिळताच ओम साई फौंडेशनच्या रुग्णवाहिका सह स्वयंसेवक व नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील नांदुरा तहसिलदार मुकूंदे यांची टीम घटनास्थळी मदत करण्यासाठी दाखल झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!