spot_img
spot_img

गणेश बरबडेंना मनसेची चिखली विधानसभेची उमेदवारी जाहीर

चिखली (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये चिखली विधानसभेसाठी गणेश बरबडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. गणेश बरबडे हे मनसे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आहे. शिवसेनेपासून राजकीय सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणारे गणेश बरबडे यांनी शहरातील संभाजीनगर मधील शाखाप्रमुख पदापासून पक्षसंघटनेला सुरुवात केली. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर पुन्हा त्यांनी शहरातील संभाजीनगर भागातून संघटनेची सुरुवात करून आज मनसे जिल्हाप्रमुख पदापर्यंत त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!