spot_img
spot_img

BREAKING! साखरखेर्ड्यात भरदिवसा खळबळ! दारू पिण्यासाठी पैसे मागत थेट महिलेच्या घरात घुसला; नकार देताच घडलं संतापजनक कृत्य! ५७ वर्षीय महिलेला मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी; ‘शेरा’विरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे भरदिवसा एका ५७ वर्षीय महिलेच्या घरात घुसून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वार्ड क्रमांक ६ मधील निर्मला रामचंद्र पंचाळ (५७) या घरी असताना शेख सोरब शेख रहीम उर्फ शेरा हा त्यांच्या घरात आला. त्याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे महिलेने सांगताच त्याने अश्लील शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

या झटापटीत महिलेच्या उजव्या डोळ्याजवळ व कपाळावर सूज आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी अपराध क्रमांक ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, २९६, ११५(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!