बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातील अंगणात वाळत असलेला गाऊन (वस्त्र) तोंडावर टाकून एका अज्ञात मुलाने गळ्यातील सौभाग्याचे प्रतीक असलेले सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना बुलढाणा येथील पाठक गल्लीत घडली.
जिल्हा परिषद हायस्कूल मधून सेवानिवृत्त झालेली शिक्षिका पतीसोबत पाठक गल्ली येथे राहते.हे दाम्पत्य अधून मधून अमरावती येथे मुलं असल्याने जात असतात.नेहमीप्रमाणे ह्या शिक्षिका घराजवळील राम मंदिरात दर्शनाकरिता गेल्या त्यानंतर त्यांचे पती मंदिरात गेले. त्यांच्या पतीच्या दर्शनाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.त्या चार दिवसापूर्वी पडलेल्या असल्याने त्यांना चालता येत नव्हते म्हणून त्यांनी मदतीसाठी कुणी आहे का असा आवाज दिला. दरम्यान एक अनोळखी मुलगा हातात घराबाहेरील वाळत टाकलेला गाऊन घेऊन घरात शिरला. अचानक त्याने गाऊन तोंडावर टाकून गळ्यातील सोन्याची पट्टी मणी एक मंगळसूत्र असलेली पोत तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून शिक्षिकाने आरडाओरडा केली असता तो बाहेर पळाला. परंतु बाहेरून कोणी प्रतिसाद देत नसल्याने तो पुन्हा घरात शिरून त्याने एकटेपणाचा फायदा घेत अखेर मंगळसूत्र व पट्टी मनी चोरीची संधी साधलीच !याप्रकरणी केसाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.