बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार यांना शिंदे शिवसेना गटाची उमेदवारी तत्पूर्वीच जाहीर झाली होती.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुणाल गायकवाड यांनी वडील आमदार संजय गायकवाड यांचा एबी फॉर्म स्वीकारला आहे.
शिवसेना पक्षाचे मुख्यनेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याहस्ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संजय गायकवाड यांच्यातर्फे एबी फॉर्म महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य तथा युवासेना जिल्हाप्रमुख युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी नुकताच स्वीकारला आहे.