spot_img
spot_img

बुलढाण्यात पहिल्या नवीन ॲक्युपंक्चर कॉलेजला मंजुरी! -50 विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील स्किल बहुउद्देशीय संस्था अंतर्गत बुलढाण्यात नव्याने स्किल ॲक्युपंक्चर कॉलेज सुरू करण्यास जिल्ह्यातील पहिल्या ॲक्युपंक्चर कॉलेजला शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत सुरू असलेल्या महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद मुंबई यांनी अधिकृत मान्यता दिली आहे.

यामहाविद्यालयात ‘पदविका इन ॲक्युपंक्चर’ चिकित्सा’ अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली. या नव्या कॉलेजच्या स्थापनेमुळे आरोग्य सेवांमध्ये एक नवा अध्याय सुरू होणार असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ॲक्युपंक्चर च्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
ॲक्युपंक्चर हे प्राचीन उपचार तंत्र असून त्याला आधुनिक वैद्यकीय शास्त्रात महत्त्वाची जागा मिळाली आहे. या नवीन कॉलेजमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ या तंत्राचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि आरोग्य सेवा क्षेत्रात अधिक रोजगार संधी निर्माण होतील तसेच या नवीन अभ्यासक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक व आरोग्य सेवेचा विकास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त आहे महाविद्यालया मध्ये 50 विद्यार्थ्यांना सन 2024-25 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेने आजपर्यंत विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. गुणवंत आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध संस्थेने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या नवीन अभ्यासक्रमाची मान्यता घेतली आहे.

▪️महाराष्ट्रात 11 ठिकाणी मान्यता ! 

परिसरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून संस्थेत या वर्षापासून वैद्यकीय ॲक्युपंचर चिकित्सा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. याला शासनाची मान्यता मिळाली. याचा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्रात 11 ठिकाणी मान्यता मिळालेल्या महाविद्यालयात बुलढाणा जिल्ह्याचे समावेश केल्यामुळे संस्था शासनाचे व महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलचे प्रशासक डॉ रूमी बहेरामजी व रजिस्टर श्री नारायण नवले यांचे सचिन सुपे अध्यक्ष स्किल ॲक्युपंक्चर कॉलेज बुलढाणा यांनी आभार व्यक्त केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!