spot_img
spot_img

💥बिग ब्रेकिंग! जय’श्री’च! ताईंच्या ‘हाती’ ‘मशाल!’ -“जितेंगे हम ये वादा करो,कोशिश हमेशा ज्यादा करो! किस्मत बि रुठे पर हिम्मत ना तुटे,मजबूत इतना इरादा करो !” -जयश्रीताईंना उबाठा शिवसेनाची उमेदवारी जाहीर!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मुंबईत ठाणे मांडून बसलेल्या

जालिंदर बुधवत आणि रविकांत तुपकर व जयश्रीताई शेळके यांच्या पैकी जयश्रीताई शर्यतीत अवस्थानी होत्या. अखेर त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केल्याचे वृत्त धडकत आहे. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकी करिता ताईंची तिकीट फायनल असल्याची खात्रीलायक माहिती मुंबईतील सूत्रांकडून मिळत
असल्याचा वृत्तांत सकाळी ‘हॅलो बुलढाणा’ने प्रकाशित केला होता.हा वृत्तांत शंभर टक्के खरा ठरला. जयश्रीताईं शेळके,रविकांत तुपकर,जालिंदर बुधवत दुपारी मातोश्रीवर उमेदवारीसाठी चर्चे करिता गेले होते.यामध्ये रविकांत तुपकर यांची चर्चा फिस्कटली त्यांनी तडक मातोश्री सोडून ‘एकला चलो चा’ नारा दिला आहे. दरम्यान तूर्तास बुधवत यांना थांबविण्यात आले असून जयश्री ताई शेळके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.दरम्यान बुलढाणा विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई शेळके उबाठा शिवसेना कडून लढणार असून इतर उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे चित्र दिसून येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!