spot_img
spot_img

घड्याळ सोडली हाती तुतारी ! -अजीत पवार गटाला गळती.. -अनेकजण डॉ. शिंगणेंच्या प्रवेशाने शरद पवार गटात !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तळ्यात मळ्यात करणारे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी अजित पवार यांचा गट सोडून शरद पवार गटात सामील झाले आणि देऊळगाव महीत व सिंदखेड राजात एकच जल्लोष झाला आहे. दरम्यान अजित पवार गटाच्या अनेकजणांनी शिंगणे यांना पाठिंबा दर्शविला असून शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश केला असून, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात घरवापसी केली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे छोटेखानी कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार, पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे इतर नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश सोहळा संपन्न झाला. दरम्यान त्यांच्या समर्थकांनी देखील प्रवेश घेतला आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विलास मनवतकर जिल्हा सरटणीस,राजेश जावळे माजी उपसभापती कृ ऊ बा समिती,बाळू पवार तालुकाध्यक्ष ,राम खेडेकर उपसभापती कृऊबा समिती,कृष्णा मिसाळ संचालक कृऊबा समिती, डॉ प्रकाश शिंगणे माजी नगर सेवक, अंकुश थुट्टे या समर्थकांनी
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सोबत
अजित पवार गटातुन शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!