बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय.विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच पक्षांना लागलेय. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने देखील लोकसभा निवडणुकीवर ‘फोकस’ केलाय. मनसे बुलढाणा विधानसभा निवडणूक लढविणार आहे. परंतु मनसेला बुलढाण्यात विठ्ठल लोखंडकार यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुलडाणा विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला होता.त्यांनी लोकसभेत देखील मतदारसंघाचा आढावा घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या मतदारसंघातील नेते, कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी ‘ग्रीन सिग्लन’ मिळाला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही मनसेची उमेदवार निवडणूक लढविणार आहे.परंतु मनसेत आक्रमक आंदोलन करणारे राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.











