देऊळगाव साकरशा (हॅलो बुलढाणा/गणेश पाटील) अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लिपिक म्हणून कार्यरत असलेले 41 वर्षीय लिपिक नंदू श्रीराम धंदरे रा. गणेशपुर ता. जि. खामगाव हे तब्बल दोन वर्षा पूर्वी बेपत्ता होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे हिवरखेड पोलिसांनी त्यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड करून 2 आरोपींना अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार मूळचे गणेशपुर येथील रहिवासी व प्राथमिक आरोग्य केंद्र अमलापुर येथे क्लर्क म्हणून कार्यरत असणारे नंदू श्रीराम धंदरे हे 18 ऑक्टोंबर 2022 रोजी बेपत्ता झाले होते या आशयाची तक्रार त्यांच्या पत्नी सौ सविता नंदू धंदरे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली होती.सदर प्रकरणाचा तपास हिवरखेड पोलीस करीत होते. दरम्यान 2 वर्षानंतर ठाणेदार कैलास चौधरी, गणेशपुर बीटचे बीटजमदार विठ्ठल चव्हाण,नायक पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांना नंदू धंदरे याचा अनैतिक संबंधातून घातपात झाल्याची माहिती मिळाली.या आधारे सदर प्रकरणाचा त्या दिशेने तपास करून गणेशपुर येथील आरोपी दीपक शालिकराम ठोके वय 23 वर्ष यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला असता त्याचा मित्र आरोपी अतुल गंगाराम कोकरे वय 28 वर्ष राहणार गणेशपुर याने त्याचे नंदू धंदरे यांचा मृतक लहान भाऊ प्रकाश श्रीराम धंदरे यांच्या विधवा पत्नी सोबत अनैतिक संबंधात असलेला अडथळा दूर करण्यासाठी नंदू धंदरे याचा खून करून दीपक ढोके याच्या मदतीने त्याचे प्रेत गणेशपुर शेत शिवारात उंद्री गणेशपुर रोडवर असलेल्या रोडवर शेतातील धुऱ्यामध्ये पुरले असल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्याची माहिती ठाणेदार चौधरी यांनी वरिष्ठांना दिली सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करून एसडीपीओ ठाकरे तालुका दंडाधिकारी जाधव गणेशपुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पागोरे, पोलीस व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आरोपीने दाखविलेल्या घटनास्थळावर जाऊन सदर जागेत
12 ऑक्टोंबर रोजी खोदकाम केले. दरम्यान नंदू धंदरे याचा हाडाचा सापळा मिळून आला आहे.त्यामुळे हिवरखेड पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 296/24 कलम 302/201/34 भारतीय दंडशेतीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपासठाणेदार कैलास चौधरी व पोलीस करीत आहेत.














