बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे, यांनी मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसाला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ध्रुपतराव सावळे पूर्ण काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार ध्रुपतराव सावळे यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला असून परवा मुंबईमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची निश्चित बातमी सूत्राकडून कळाली आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले व माजी भाजपा जिल्हाध्यक्ष असलेले श्री ध्रुपतराव यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाने बुलढाणा व चिखली विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राजकीय गणिते बदलू शकतात.श्री सावळे यांच्या पक्षप्रवेशाने बुलढाणा व चिखली मतदारसंघांमध्ये त्यांची”नातेवाईक लॉबी” असलेली हजारो मते ते नेहमीच स्वतःकडे आकर्षित करण्यास यशस्वी ठरतात.त्यामुळे ध्रुपतराव सावळे काँग्रेसमध्ये प्रवेशित झाल्यास आणि त्यांनी स्वतःच्या मुलीसाठी किंवा स्वतःसाठी तिकीट न मागितल्यास त्याचा खूप मोठा फायदा चिखली व बुलढाणा मतदार संघात काँग्रेसला होईल याविषयी कोणालाही शंका नाही.