मलकापुर (हॅलो बुलढाणा/करण झनके) अमरावती पुणे एसी गाडीचा थांबा मंजूर झाला असून या थांब्याचा उद्घाटन सोहळा आज १० ऑक्टोंबरला केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, मलकापूरचे माजी आ. चैनसुख संचेती या हस्ते मलकापूर रेल्वे स्थानकावर संपन्न होत आहे.
केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचा प्रयत्नातून मलकापूरला गाडी नं२२११७-२२११८ अमरावती पुणे संपूर्ण एसी गाडीचा थांबा मिळाला आहे. मलकापूर येथून मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे येथे प्रवास करत असतात.या गाडीच्या थांब्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या गाडीचा थांबा उद्घाटन सोहळा जिल्हा प्रवासी सेवा संघ व भाजपा रेल्वे प्रकोष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज रात्री ८:३० वाजता मलकापूर रेल्वे स्थानक प्लेटफार्म नं १ वर पार पडत असून प्रवाशांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवहन तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष पारसमल झाबक जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष ॲड महेंद्रकुमार बुरड ,रेल्वे प्रकोष्ट जिल्हाअध्यक्ष रुपेश श्रीमळ,अँड म्हेसागर शहर अध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांनी केले आहे.