बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे उपचार वेळेवर मिळणार असून रुग्णाच्या मृत्यूतील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.
आज दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणाचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला.
या भूमिपूजन सोहळ्याचे पंतप्रधान मा. नामदार श्री नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी.पी राधाकृष्णन, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.श्री जे.पी नड्डा,केंद्रीय आयुष्य मंत्री मा.ना श्री प्रतापरावजी जाधव, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस,मा. ना श्री अजितदादा पवार,पालकमंत्री मा.ना.श्री दिलीप वळसे पाटील, चिखली येथील आमदार सौं. श्वेताताई महाले प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व आयुक्त श्री राजीव निवतकर, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री गुलाब खरात, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉक्टर अजय चंदनवाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा सेल चिकित्सक बुलढाणा डॉक्टर भागवत भुसारी, जिल्हा स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा स्त्री जिल्हा रुग्णालय क्षय आरोग्यधाम परिसर धाड रोड येथील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.