spot_img
spot_img

धक्कादायक! खामगावात भरधाव कारचा कहर – ड्युटीवरील दोन सुरक्षारक्षकांचा जागीच मृत्यू; CCTV मध्ये थरारक दृश्य कैद

खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरात भरधाव वेगाच्या बेफाम कारने दोन निष्पाप जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नांदुरा रोडवरील हॉटेल पुष्पांजलीसमोर रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद किसन शेगोकार (वय 65) आणि विवेक देविदास पायघण (वय 41) हे दोघे सुरक्षारक्षक आपल्या कर्तव्यावर तैनात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या Maruti Suzuki WagonR कारने त्यांना अक्षरशः चिरडले. धडक इतकी भीषण होती की दोघेही हवेत उडून दूर फेकले गेले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला.

या अपघाताचे थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यातून कारचा वेग आणि धडकेची भीषणता स्पष्ट दिसत आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, सुरुवातीला अल्पवयीन चालकाची चर्चा रंगली होती; मात्र पोलिसांच्या तपासात प्रितपालसिंग अमरजितसिंग संधू हा वाहन चालवत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून मुंबई पुणे महामार्ग वरही बसने तीन वाहनांना धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हेल्प फाउंडेशनच्या मदतीने बचावकार्य सुरू असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!