बुलडाणा (हॅलो बुलढाणा) आधुनिक संशोधन आणि आरोग्य सेवेशी पारंपारीक पध्दतीने जोडणारे उत्कृष्ठ केंद्र म्हणून अखिल भारतीय आयुर्वेदीक संस्था (AIIA) अखिल भारतील आयुर्वेदिक संस्था महत्वाची भूमिका बजावीत आहे असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
अखिल भारतीय आयुर्वेदीक संस्थेच्या आठव्या स्थापना दिनां निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन आज 09 ऑक्टोंबरला नवी दिल्ली येथे करण्यात आले होते त्यानिमित्त मार्गदर्शन करतांना केंद्रीय आयुषमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु, उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु यांना प्राचीन आयुर्वेद संदर्भांतील प्रतिमा भेट दिली.
यावेळी बोलतांना केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, गेल्या आठ वर्षात अखिल भारतील आयुर्वेदिक संस्थेने जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रगत शैक्षणिक कार्यक्रम आणि उपचारात्मक पध्दतीव्दारे आयुर्वेदाचा प्रचार प्रसारात महत्वाची भूमिका बजावली आहे. प्राचिन काळातील भारताचा आयुर्वेदीक वारसा हा सातासमुद्रा पलिकडे पोहचविण्याच्या दृष्टीकोनातुन अखिल भारतील आयुर्वेदिक संस्था भूमिका ही महत्वपुर्ण ठरली आहे. अखिल भारतीय आयुर्वेदीक संस्थान तर्फे आठव्या स्थापना दिना निमीत्त आयेजित कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य संचालक सोहम वायाळ ही उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर अखिल भारतीय आयुर्वेदीक संस्थानच्या जनऔषधी केंद्राचा लोकार्पण केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या जनऔषधी केंद्राच्या माध्यमातुन कमी दरात आणि सुलभ रित्या सर्वसामान्यांना औषध उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.