spot_img
spot_img

शहजाद खान सलीम खान यांना वंचितची उमेदवारी जाहीर !

मलकापूर (हॅलो बुलढाणा / करन झनके) राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.दरम्यान स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने

मलकापूर विधानसभेसाठी एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष शहजाद खान सलीम खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

वंचित चे सर्वेसर्वा ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभेसाठी 10 नावांची घोषणा केली आहे. वंचितने घोषित केलेल्या 10 उमेदवारांपैकी सर्व 10 जन मुस्लिम आहेत.
मे-जूनमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुत वंचित आघाडी पक्ष स्वतंत्रपणे लढला होता. त्यामध्ये त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. असे असूनही आता विधानसभा निवडणुकीतही वंचित स्वबळावर लढणार आहे.दरम्यान त्यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी शहजाद खान सलीम खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शहेजाद खान Mim चे माजी जिल्हाध्यक्ष होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!