बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खास समर्थक असलेल्याची ओळख आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी पुसून अजित पवार गटात प्रवेश केला.आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा घरवासी चा प्रयत्न शिंगणे यांनी केल्याची चर्चा आहे.कारण मंगळवारी सुप्रिया सुळे यांच्या गाडीत जाताना शिंगणे यांनी फाईलने चेहरा लपवला असल्याची बातमी धडकली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी व पक्ष बदलाचा खेळ सुरू झाला आहे.अनेक इच्छुकांनी चालत्या गाडीत बसण्याचे ठरविले आहे.माझी आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे विद्यमान आमदार आहेत.सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत.आता मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रविकांत तुपकर यांची सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याने येथील इच्छुक उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.दरम्यान आता जिल्हा बँकेला कोट्यावधीचा निधी मिळाला असल्याने आधी अजित पवार गटात सामील झालेले डॉ राजेंद्र शिंगणे आता मात्र शरद पवार यांच्या गटात घरवापसी करतानाचे दिसून आले आहेत.त्यांनी शरद पवारांची मंगळवारी भेट घेतल्याची चर्चा आहे.मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या वाहनात जाताना डॉक्टर शिंगणे यांनी फाईल ने चेहरा लपवल्याची बातमी समोर आली आहे.त्यामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात चर्चेला पेव फुटले आहे.










