बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) सरपंचांची एकजूट महत्वाची असल्याचे प्रतिपादन अ भा सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केले.
अखिल भारतीय सरपंच परिषदेची जिल्हा कार्यकारी गठित करण्यासाठी बुलढाणा येथे 7 ऑक्टोबरला आराध्या लॉन्स येथे बैठक संपन्न झाली.त्यावेळी पाटील बोलत होते.या बैठकीला अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाव खेड्याचा कारभार चालवत असताना येणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सरपंच हा महत्त्वाचा घटक असून त्यांची एकजूट असणे आवश्यक आहे. म्हणूनच या बैठकीमध्ये सर्वांनूमते कार्यकारणी घटित करण्याचे ठरवले गेले. सदर कार्यकारणी मध्ये रूईखेड मायंबा सरपंच श्री अनिल फेपाळे यांना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तसेच अस्तिक वारे देवपूर सरपंच यांना जिल्हा कार्याध्यक्ष तर श्री श्याम सावळे जिल्हा उपाध्यक्ष डोंगर खंडाळा उपसरपंच यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जयंत पाटील यांच्या सरपंचांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंतच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच पंधरा लाख रुपयापर्यंत विकास कामे करण्याचा ग्रामपंचायतचा अधिकार पूर्ववत मिळवणे आणि सरपंच उपसरपंचांचे मानधन दुप्पट होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले ग्रामीण महाराष्ट्र गावखेडी आणि ग्रामस्थांसाठी सरपंचांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केल्यास विकास सहज शक्य आहे.
सरपंच झाल्यानंतर गावच्या विकासाला प्राधान्य देऊन प्रत्येक गावकरी समान समजून काम केल्यास मोठे परिवर्तन घडते. सरपंचांनी ग्रामपंचायत चालवण्याबरोबरच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकरी गट, फार्मर प्रोडूसर कंपन्या स्थापन करण्याचे संस्थापक अध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी आवाहन केले. सरकारकडून सरपंच उपसरपंच यांना विमा संरक्षण त्याचप्रमाणे पेन्शन लागू करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्याचा संकल्प केला, तसेच गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत शासनाच्या असणाऱ्या सर्व कमिट्यांमध्ये सरपंच प्रतिनिधी असावाच ही मागणी लावून धरण्यात येईल.
परंतु त्यासाठी सरपंचांची एकजूट अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जिल्हा कार्यकारणी गठीत केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी येळगावचे सरपंच दादा लवकर तसेच सतीश पाटील , संजय काळवाघे,नागेश पाटील, गजानन वतपाव, मधुकर महाले, प्रल्हादजी सुलताने,कुमार वाघ,गजानन भोलाणे, विजय तेजनकर रामेश्वर बुधवत ,भगवान रींढे,भिकनराव भुतेकर , रामभाऊ जाधव , जनार्धनआप्पा सूसर, अजय गायकवाड, विलास महाराज शेळके, सचिन खेडेकर विनोद कणखर, अर्जुन दांडगे आदींनी कार्यक्रम यशस्वी केला. लवकरच प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा पदाधिकारी दौरा करून तालुकाध्यक्ष व कार्यकारणीच्या नेमणूक करण्यात येतील असे या ठिकाणी जाहीर करण्यात आले.