spot_img
spot_img

‘भाईगिरी!’ ‘लोणारचे बाप’ म्हणत तरुणावर चाकु हल्ला !

लोणार (हॅलो बुलढाणा /राहुल सरदार)आम्ही ‘लोणारचे बाप’ असे म्हणत
शिवीगाळ करीत धारदार चाकूने ३ वार करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना लोणार येथील धार चौकात उघडकीस आली आहे.

लोणार मधील धार चौकातील संतोष रामकृष्ण शेडुते वय ३९ वर्ष यांचे मधुर स्वीट मार्ट आहे. या दुकानावर ६ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजे दरम्यान आरोपी संतोष बंडू मिसाळ वय २५ व सुरेश नामदेव आरे वय ४४ वर्ष हे पाण्याची बॉटल घेण्यासाठी आले. पाण्याची बॉटल घेतल्या नंतर त्यांनी बॉटलच्या पैश्याची मागणी केली असता ‘तुला समजत नाही आम्ही कोण आहे? तुला माहीत नाही का आम्ही लोणार चे बाप आहे!’ आमच्या नादी लागू नको लोणारचे चांगले चांगले लोक आमच्या नादी लागत नाही आमच्या कडे पैसे नाहीत म्हणत शिवीगाळ करत धारदार चाकूने ३ वार करून हल्ला केला यामध्ये संतोष रामकृष्ण शेडुते हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले,बिट जमादार संजय जाधव,नितीन खरडे ,अनिल शिंदे, संतोष चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींना काही वेळातच शोधून जेरबंद केले. जखमीचे भाऊ सचिन रामकृष्ण शेडुते यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी कलम १०९ (१),३५२,३५१(२)३(५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले नितीन खरडे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!