बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सिंदखेडराजा व किनगाव राजा येथे एलसीबीच्या पथकाने अवैध दारू व जुगारावर कारवाई करीत 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने 5 ऑक्टोंबर रोजी सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीत व किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू आणि जुगारावर कारवाई करण्यात आली आहे.किनगाव राजा हद्दीमध्ये एका आरोपीकडून 1260 रुपयाच्या 18 नग देशी दारू निमगाव वायाळ येथून जप्त करण्यात आल्या आहेत.तर सिंदखेडराजा पोलीस स्टेशन हद्दीत जुगारावर छापा मारून 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. बावनपत्त्यासह 19 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई एचसी दिगंबर कपाटे,एलएचसी वनिता शिंगणे, पीसी दीपक वायाळ या एलसीबी पथकाने केली आहे.