spot_img
spot_img

नळगंगात आंदोलकाने घेतली उडी ! -आदिवासी कोळी महादेव समाजबांधवाचे जलसमाधी आंदोलन ! -पोलिस बंदोबस्त व रेस्क्यू टीम अलर्ट !

मलकापूर (हॅलो बुलढाणा /करण झनके) जातीचे प्रमाणपत्र द्या ! ही प्रमुख मागणी घेऊन आदिवासी कोळी महादेव समाज बांधवाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे.दरम्यान एका आंदोलकाने नळगंगा धरणात उडी घेतल्याने प्रशासन हादरले त्वदच रेस्क्यू टीमने त्या आंदोलकाला पाण्याबाहेर काढले आहे.

आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी प्रशासाविरोधात तिव्र नाराजी व्यक्त करत नळगंगा धरण येथे जलसमाधी
आंदोलन करणार असल्याचा प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानुसार सुमारे काल बारा वाजेच्या दरम्यान काही आंदोलकांनी नळगंगा धरण परिसरात असलेल्या पुलावरून धरणात उडी घेत घोषणाबाजी केली परंतु प्रशासनाने काही कार्यकर्ते जलसमाधी घेणार असल्याचे कळताच रेस्क्यू टीम सह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान एका आंदोलकाने उडी घेताच रेस्क्यू टीम तिथे पोहोचून त्या आंदोलकाला पाण्यातून बाहेर काढून ताब्यात घेण्यात आले व इतर आंदोलकांना मोताळा तहसीलदार हेमंत पाटील व बोराखेडी पोलीसांनी शांततेत समजावून या विषयावर लवकरच मार्ग काढू असे आश्वासन दिले. परंतु आंदोलक कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र द्या यावर ठाम होते.गत दोन महिन्यापासून मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रकरण सादर केले आहे परंतु त्यांनी ते नामंजूर केले, कोणत्या त्रुटी आहेत ते पूर्ण करण्यास तयार आहे, या संदर्भात अनेकदा समाज बांधव भेटले परंतु त्यांनी कोणतीही सकारात्मकता दाखवली नसल्यामुळे नळगंगा नदीच्या पात्रात आंदोलकांनी उड्या मारून
जलसमाधी आंदोलन छेडले आहे.उपविभागीय अधिकारी हे सध्या ट्रेनिंग मध्ये असून ते 12 तारखेला परत येतील त्यानंतर समपोचाराने याबाबत निर्णय घेऊ असे सांगत मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!