spot_img
spot_img

मोबाईल चोरी व देशी दारू बाळगल्या प्रकरणी 3 आरोपींना अटक ! -1 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मोबाईल चोरी व देशी दारू बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 3 आरोपींना अटक करून 1 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शेख कैफ शेख फारूख वय 20 रा. इकबाल चौक बुलढाणा या आरोपीच्या ताब्यातून विओ कंपनीचा 50000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर

गजानन श्रीराम धंदर वय 24 रा. पारडी ता.मेहकर व संप्रीत राजू उतपूरे वय 22 रा.हिवरा खुर्द तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या ताब्यातून देशी दारु 400 नग किमतीचे 14000 रुपये व दोन मोबाईल किंमत 1300 तसेच मोटार सायकल किंमत 50,000 रु असा एकूण 77000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप क्रमांक 423 2024 कलम 379 भांदवि नुसार मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता.याचा पोलीस तपास सुरू होता. दरम्यान 4 ऑक्टोंबर ला मलकापूर ग्रामीण हद्दीतत काही इसम मोटरसायकलवर विनापरवाना व अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी जाळे रचून दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!