देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्या जीवाची पर्वा न करता तत्काळ मदतीसाठी धाव घेते ते पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक ! या पथकाने आमना नदीपात्रात सतत दोन दिवस शोध घेऊन 20 किलोमीटर पर्यंत पायी प्रवास करून वाहून गेलेल्या बापलेकांचा मृतदेह शोधून काढल्याने या अवघड आणि तत्पर सेवेला देऊळगाव राजा पोलिसांनी सॅल्यूट ठोकला आहे !
आपत्ती ओढवली तर त्याचा प्रतिकार करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपत्ती कधीही येऊ शकतात. त्या नियोजित नसतात.परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते.परंतु दुर्दैवाने परतीच्या पावसाने बापलेकाचा घात केला. 5 वर्षाचा चिमुकला अथर्व दीपक निकाळजे व त्याचे वडील दीपक प्रल्हाद निकाळजे वय 28 हे पुरात वाहून गेले होते.सतत दोन दिवस त्यांचा मृतदेह सापडला नाही.परंतु मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन अंतर्गत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोलाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी आता परिश्रम घेत चिमुकल्या अथर्वचा चिंचोली बुरुकुल शिवारातून तर त्याचे वडील दीपक निकाळजे यांचा पिंपळखुटा शिवारातील आमना नदीपात्रात मृतदेह शोधून काढला.या शोध मोहिमेचा वीस किलोमीटर पर्यंतचा पायी प्रवास सोपा नव्हता.शिवाय पाण्याच्या प्रवाहात या पथकाने जीव धोक्यात टाकून मृतदेह शोधून काढला.दरम्यान देऊळगाव राजा पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्य शोध मोहिम राबविणारे मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फॉऊडेशन संत गाडगेबाबा आपतकालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोलाचे दिपक रामकृष्ण सदाफळे व त्यांचे सहकारी मयुर सळेदार, धिरज राऊत, शेखर केवट, निखील बोबडे, मयुर कळस्कर, अश्विन केवट, निलेश खंडारे,
महेश वानखेडे या टीमचे अभिनंदन करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.