बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काम दाखवा बक्षीस मिळवा : ‘हॅलो बुलडाणा’ ऑफर दरम्यान, या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केल्यानंतर भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार मोठ्या प्रमाणात आदळआपट करीत असल्याचे दिसत आहे. काहींनी हॅलो बुलडाणा संपादकीय विभागाला व व्यवस्थापनाला धमक्या देणे सुरू केले आहे. आमच्या बदनामीचा डाव आखला असल्याचा आरोप हॅलो बुलडाणा व सिटी न्यूज वृत्तवाहिनीवर करण्यात आला आहे. आमच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार नाही, असा पोकळ दावाही संबंधित मंडळी करीत आहेत. परंतु हे काम करणारा कंत्राटदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांना आव्हान आहे की, वर्क ऑर्डर व ईस्टीमट नुसार काम झाल्याचे स्पष्टपणे दाखवून द्या,एकदा या कामाचे पब्लिक ऑडिट होऊ द्या. जर हे काम योग्य पद्धतीने झाले असेल, तर हॅलो बुलडाणा संबंधितांना या कामासाठी मानसन्मानाने “इनाम” देण्यास तयार आहे. हिम्मत असेल तर हे आव्हान कंत्राटदार किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी स्वीकारून दाखवावे.
क्रमशः