बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयात ठाणं मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली का होत नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.त्याचे कारण असे आहे की, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला या संदर्भात झापले आहे. तीनदा वार्निंग देऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या का थांबवल्या असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
बुलढाणा मुख्यालय असून तेराही तालुक्यात प्रशासकीय कार्यालय आहेत.परंतु तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेले अधिकारी कर्मचारी येथे ठाणं मांडून बसले आहेत.यामध्ये जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम,समाज कल्याण,जिल्हाधिकारी कार्यालय,पाटबंधारे विभाग,जिल्हा सामान्य रुग्णालय ,कृषी विभाग,महसूल विभाग,आणि पोलिस विभाग व नगर परिषद आदी खात्यांचा समावेश आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दबाव तंत्राखाली आणि वरिष्ठांच्या जोरावर हे बदली नाट्य सुरू असतं ! दरम्यान निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. निवडणूक आयोगाने या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारला झापले आहे. तीनदा वॉर्गिंन देऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या का थांबवल्या? असा सवाल निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. निवडणुक अधिकाऱ्यांनी CEO, SPNO, नोडल ऑफिसर आणि CPMF अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाणं मांडून बसणाऱ्यांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘वरिष्ठांची’ कृपा…
जिल्ह्यातील शासकीय कार्यलयात मुख्यालयी ठिकाणी वर्षोनवर्षे विविध कारणे दाखवून (डेपोटेशनवर) एकाच विभागात काही मान्यवर संगीत खुर्ची खेळत आहे.
सविस्तर धक्कादायक माहिती पुढील भागात