बुलढाणा (हॅलो बुलढाणा) घरात खेळत असलेल्या एका अडीच वर्षीय चिमुकलीवर घरात घुसून एका कुत्र्याने हल्ला केला. यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना ढालसावंगी या गावात घडली आहे.तत्पूर्वी मोताळा तालुक्यातील नळकुंड येथे बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.दरम्यान फॉरेस्ट विभाग आणि नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या घटनेबद्दल अनभिज्ञ असल्याचा आरोप होत आहे.या संदर्भातील उपाय योजनांची मागणी केली जात आहे.
अनाबिया अजहर खान वय अडीच वर्ष रा. धाड ता.जि. बुलढाणा ही आपल्या आई सोबत मामाच्या गावी ढालसावंगी येथे आलेली होती. आज गुरुवारी दुपारी ती घरात खेळत असताना एका कुत्र्याने आत प्रवेश करून चिमुकलीवर हल्ला चढविला. घरातील इतर मंडळी धावून आल्याने कुत्रा घराबाहेर पडून गेला मात्र या हल्ल्यात अनाबियाच्या तोंडावर चावा घेतल्याने तिला गंभीर दुखापत झालेली आहे. सध्या तिच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या कुत्र्याने ढालसावंगी येथील इतर 4 ते 5 जनावर सुद्धा हल्ला करून जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. सदर कुत्रा पिसाळलेला असल्याची शंका आल्याने नागरिकांनी त्याला ठार मारले.