spot_img
spot_img

महा टीईटीला बुलढाण्यात कॉपीचा ‘गेम ओव्हर’; 22 केंद्रांवर 12 हजार उमेदवारांची कसोटी

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी रविवार, 28 जून हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित महा टीईटी परीक्षा बुलढाणा शहर व परिसरातील 22 परीक्षा केंद्रांवर होणार असून, या परीक्षेसाठी 12 हजारांहून अधिक परीक्षार्थी प्रविष्ट आहेत. त्यामुळे प्रशासनाने कंबर कसली असून परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.

परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, फ्रीस्किंग, बायोमेट्रिक तपासणी आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. केंद्र संचालक, सहायक परिरक्षक आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती पूर्ण झाली आहे. 25 जून रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी परीक्षार्थ्यांना विनाकारण त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा नियंत्रण कक्षाने परीक्षार्थ्यांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत. बायोमेट्रिक व तपासणीला वेळ लागणार असल्याने उमेदवारांनी दीड तास आधी केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे. मोबाईल, घड्याळ, पेजर यांसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य निषिद्ध आहे. परीक्षागृहात शूजला मनाई आहे. हिजाब किंवा बुरख्यास मनाई नसली तरी तपासणीसाठी मानेवरील भाग उघडा ठेवावा लागणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!