spot_img
spot_img

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मागणीला यश ! भुसावळ, मलकापूर व नांदुरा येथे विविध रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर…

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) भुसावळ, मलकापूर व नांदुरा येथे विविध रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर झाला असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

मध्य रेल्वे अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील भुसावळ, मलकापूर व नांदुरा येथे विविध रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी नांदुरा स्टेशन येथे 12113/12114 पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस, मलकापूर स्टेशन 22117/22118 पुणे-अमरावती एक्सप्रेस तर सर्वात महत्वाचे भुसावळ स्टेशन येथे 22221/22222 मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेस या ३ गाड्यांना थांबा दिला असल्याचे कळविले असून, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मागणीस यश आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!