बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढून तब्बल अडीच लाख मतदान घेणारे शेतकरी नेते रविकांत तूपकर यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत विजय पक्का समजला जात आहे.दरम्यान त्यांना ॲड.प्रकाश आंबेडकरांनी सोबत येण्यासाठी साद घातल्याचे खात्री लायक वृत्त आहे.
माहितीनुसार,जर रविकांत तुपकर व प्रकाश आंबेडकर यांची तिसरी आघाडी झाल्यास महाराष्ट्रातुन बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीला आपल्या जागा गमवाव्या लागतील असे जाणकार म्हणत आहेत.तसेच आता तरी महाविकास आघाडीने रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्ह्यातून योग्य तो मतदार संघ त्यांना द्यावा व सोबत घ्यावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे.
महाविकास आघाडीने आता जर रविकांत तुपकर यांची दखल घेतली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा गमवाव्या लागतील याविषयी जिल्ह्यात चर्चेला उधान आले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविकांत तुपकर व त्यांचा जिल्ह्यात असलेल्या दांडगा जनसंपर्क पाहिलाच आहे.तुपकर यांचे आंदोलनही सर्वश्रुत आहे. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा जिल्ह्यातील एकमेव धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.सामान्य शेतकरी परिवारातून आलेल्या या नेत्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी त्यांना सोबत घेण्यासाठी तत्पर दिसून येत आहे.